Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

2020 मधिल मराठी साहित्य रत्न काळवश

 2020 मधिल   साहित्य रत्न काळवश 2020 मधिल साहित्य रत्न काळवश . उत्तम बंडू तुपे उत्तम बंडू तुपे (जन्म : एनकूळ-खटाव (सातारा जिल्हा), १ जानेवारी १९४२; मृत्यू : पुणे, २६ एप्रिल २०२०) हे एक मराठी साहित्यिक होते.टोपणनाव:- झुलवाकार तब्बल १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची 'झुलवा' ही कादंबरी प्रचंड गाजली. तेव्हापासून ते 'झुलवा'कार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले. 'आंदण' या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. 'काट्यावरची पोटं' या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. 'झुलवा' कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. आंदण (लघुकथा संग्रह) इजाळ (कादंबरी) कळा (कादंबरी) कळाशी (कादंबरी) काट्यावरची पोटं (आत्मचरित्र) कोबारा (लघुकथा संग्रह) खाई (कादंबरी) खुळी (कादंबरी) चिपाड (कादंबरी) झावळ (कादंबरी) झुलवा (कादंबरी) नाक्षारी (कादंबरी) पिंड (लघुकथा संग्रह) भस्म (कादंबरी) म...